होय माझ्या तोंडून महाराजांबद्दल चुकीचे उदगार निघाले; हात जोडून माफी मागतो – छिंदम

श्रीपाद छिंदम

अहमदनगर: होय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माझ्या तोंडातून चुकीचे उदगार निघाले. त्याबद्दल मी संपूर्ण महाराष्ट्राची हात जोडून माफी मागतो म्हणत अहमदनगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी आपल्या माफीनाम्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याचा ऑडीयो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर संपूर्ण नगर शहरात याचे पडसाद उमटत आहेत.

श्रीपाद छिंदम यांचे कार्यालय फोडले

उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याचा ऑडियो सोशल मिडीयावर व्हायरल झाला. त्यामुळे संतप्त जमावाने श्रीपाद छिंदम यांच्या कार्यालयावर दगडफेक करत तोडफोड केली

काय आहे प्रकरण

श्रीपाद छिंदम हे अहमदनगर महापालिकेचे उपमहापौर आहेत. छिंदम यांनी त्यांच्या प्रभागात काम करण्यासाठी पालिकेकडे कर्मचारी मागितले होते. संबंधित कर्मचाऱ्याने तुम्हाला तुमचे काम करून देतो, मी नाही म्हणालेलो नाही. पण शिवजयंती होऊ दिली तर बरं होईल, अशी विनंती केली. कर्मचाऱ्याच्या उत्तराने चिडलेल्या छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले. कर्मचाऱ्यावर आपला रोख झाडताना त्यांची जीभ घसरली, दरम्यान ही ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. संबंधित कर्मचाऱ्याने यूनियनकडे तक्रार केल्यानंतर सर्व प्रकार समोर आला आहे.