भिंगार पोलीस ठाण्यात अटक केलेल्या व्यक्तीकडून पोलिसाला मारहाण

crime-1

अहमदनगर: मारहाणीच्या एका प्रकरणात पोलिसांनी अटक करून पोलीस ठाण्यात आणलेल्या व्यक्तीने पोलीस कर्मचा-याला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याची घटना भिंगार कँप पोलीस ठाण्यात दुपारी घडली. पोलिसांनी सदर व्यक्तीच्या विरूध्द मारहाण करणे व सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल केला आहे.निलेश पेंडुलकर असे पोलिसाला मारहाण करणा-या व्यक्तीचे नाव आहे.

Loading...

भिंगार परिसरातील खळवाडी येथे निलेश पेंडुलकर व 4-5 जणांनी घरात घुसून रिव्हॉल्वरचा धाक दाखविल्या प्रकरणी शनिवारी भिंगार कँप पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी संतोष पानसरे यांनी भिंगार मधील ब्राह्मणगल्ली येथे जाऊन निलेश पेंडुलकर याला अटक करून पोलीस ठाण्यात आणले. त्यावेळी पेंडुलकर याने पानसरे यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.त्यावर पानसरे यांनी शिवीगाळ करू नको असे सांगितले असता निलेश पेंडुलकर याने थेट पोलीस कर्मचारी पानसरे यांच्यावर हल्ला चढविला.त्याने पानसरे यांना तोडावर मारले तसेच त्यांच्या पोटात लाथाबुक्क्यांनी जोरदार मारहाण केली.त्यानंतर पानसरे यांच्या तक्रारीनुसार पेंडुलकर याच्या विरोधात मारहाम करणे व सरकारी कामात अडथळा आणणे असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Loading…


Loading…

Loading...