अहमदनगर : आघाडीला सत्ता स्थापनेपासून रोखायचं असल्यास युती करावीच लागणार

अहमदनगर – अहमदनगर महानगर पालिकेत सत्ता स्थापनेपासून आघाडीला दूर ठेवायचं असेल तर सेना-भाजपला युती करावी लागेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. अहमदनगर महानगर पालिकेवर झेंडा कुणाचा असणार याबद्दल उमेदवारांनी स्पष्ट कल दिलेला नसल्याने त्रिशंकू स्वरूपाचे निकाल हाती येत आहेत.

68 जागांसाठी झालेल्या मतदानानंतर भाजपा-18,शिवसेना-17,राष्ट्रवादी – काँग्रेस-25, मनसे-01, बसपा-04, अपक्ष-03, इतर-08 असा कल समोर आल्याने सेना-भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी एकत्र यावं लागणार आहे.

अहमदनगर महानगरपालिकेच्या 17 प्रभागातील एकूण 68 जागांसाठी रविवारी (9 डिसेंबर) मतदान झाले. सकाळी दहा वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अनुसूचित जातीसाठी 9, अनुसूचित जमातीसाठी 1, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 18 जागा राखीव आहेत. महापालिकेच्या 17 प्रभागातील 68 जागांसाठी 339 उमेदवार रिंगणात आहेत.

‘हे सरकारच एक समस्या !’ – विखे पाटील