राम मंदिर उभारणीसाठी तोगडीयांचे उपोषण

टीम महाराष्ट्र देशा- विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदावरून गच्छंती झालेले प्रविण तोगडिया यांनी आता थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध दंड थोपटले आहेत. राम मंदिराची उभारणी आणि इतर प्रश्नांसाठी तोगडीयांनी अहमदाबादमध्ये उपोषण सुरू केलंय.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

तोगडियांनी उपोषण करू नये म्हणून गुजरातमधल्या संघाच्या तीन ज्येष्ठ नेत्यांनी त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश आले नाही. स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचल्यानंतर संघानं त्यांची उचलबांगडी करण्याची योजना आखली होती. आणि अध्यक्षपदासाठी निवडणूक घेऊन त्यात विष्णु कोकजे यांची विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली.

Shivjal