राहुल गांधींचा मोठा निर्णय, कॉंग्रेसच्या तिजोरीच्या चाव्या अहमद पटेलांकडे

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आल्यानंतर कॉंग्रेसमध्ये मोठे फेरबदल सुरु असल्याचं दिसत आहे, याचाच एक भाग म्हणजे पक्षाच्या तोजीरोच्या चाव्या खा अहमद पटेल यांच्याकडे देण्यात आल्या आहेत. पटेल यांची खजिनदारपदी नेमणूक करण्यात आल्याचं पत्रक पक्षाकडून प्रसिद्ध करण्यात आल आहे, विशेष म्हणजे आज अहमद पटेल यांचा वाढदिवस आहे, त्यामुळे राहुल गांधी यांनी त्यांना मोठ गिफ्ट दिल्याच बोलल जात आहे.

आता तरी कार्यकर्त्यांना भेटू द्या; कॉंग्रेस आमदारांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी

अहमद पटेल यांनी यापूर्वी कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव म्हणून काम पाहिलेलं होत, दोन महिन्यापूर्वी गुजरातमध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकांत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना टक्कर देत अहमद पटेल निवडणून आले होते. त्यामुळे पक्षातील त्यांचे स्थान आणखीन बळकट बनले आहे.

पटेल यांच्या आधी मोतीलाल व्होरा हे गेली २० वर्षे पक्षाच्या खजिनदारपदाची जबाबदारी सांभाळत होते, आता त्यांच्याकडे कॉंग्रेस सरचिटणीस ( प्रशासन) पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर आनंद शर्मा यांना कॉंग्रेस परराष्ट्र विभागाच्या प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली आहे.

काँग्रेस देणार मोदींविरोधात हक्कभंगाची नोटीस

You might also like
Comments
Loading...