NCP- राष्ट्रवादी मध्ये तूर्तास खांदेपालट नाही

अहमदनगर – मागील काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष बदलण्याच्या चर्चेला चांगलेच उधाण आले होते. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घसरता आलेख पाहता जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांची गच्छंती निश्चित मानली जात होती. परंतु  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जिल्हाध्यक्ष बदलाच्या कुठल्याही हालचाली नसून चंद्रशेखर घुले हेच जिल्हाध्यक्षपदी कायम आहेत, असे स्पष्टीकरण विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे जिल्हा प्रभारी दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहे.
दरम्यान, जाणीवपूर्वक कोणी खोडसाळपणे जिल्हाध्यक्ष बदलाच्या अफवा पसरुन पक्ष संघटनेच्या कामात अडथळा निर्माण करत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
You might also like
Comments
Loading...