राज्यात ३६ गावांमध्ये उभी राहणार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक सभागृहे

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरावर 36 गावांमध्ये सांस्कृतिक सभागृहांचे बांधकाम करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सन 2018-19 च्या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेची पूर्तता करण्यात आली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मरणार्थ राज्यात 36 गावांमध्ये सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम करण्यासाठी शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे दि. 7 जानेवारी 2019 रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. यासंबंधीची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सन 2018-19 चा अर्थसंकल्प विधिमंडळाला सादर करताना केली होती. प्रति सभागृह 62 लक्ष 53 हजार 400 रू. या प्रमाणे एकूण रूपये 22 कोटी 51 लाख 22 हजार 400 एवढ्या खर्चास शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

Loading...

राज्यातील ज्या 36 गावांमध्ये सदर सांस्कृतिक सभागृहांचे बांधकाम करण्यात येणार आहे, त्यात प्रामुख्याने वाशिम जिल्ह्यातील सेलू बाजार, धुळे जिल्ह्यातील वेहेरगांव फाटा व कुसुंबा, चंद्रपूर जिल्ह्यातील जुनासुर्ला व खेडी, अमरावती जिल्ह्यातील मादन, हिवरा व पुसदा, भंडारा जिल्ह्यातील चिचाळ, जैतपूर बारव्हा व सिलेगांव, सांगली जिल्ह्यातील आरेवाडी व वाळवा, बुलढाणा जिल्ह्यातील देवधाबा, हिंगोली जिल्ह्यातील कारवाडी, परभणी जिल्ह्यातील पिंपळगाव बाळापूर, चिंचोली काळे, महातपूरी, झरी, कळगाव, औरंगाबाद जिल्ह्यातील आसेगांव, उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहगड नांद्रा, चोरखडी व यमगरवाडी,वाशिम जिल्ह्यातील ढोरखेडा, यवतमाळ जिल्ह्यातील बेलोरा, नांदेड जिल्ह्यातील माळेगाव, रिसनगाव, शेळगाव (छत्री), वझरगा, लातूर जिल्;ह्यातील खारवाडी,हणमंत जवळगा, मादलापूर, अकोला जिल्ह्यातील पुनोती बु आणि वर्धा जिल्ह्यातील नाचणगाव या गावांचा समावेश आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
भिडेंच्या सांगली 'बंद'ला राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जाणार बेळगावात
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर पोलिसांच्या ताब्यात
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
भाजपचा 'हा' नेता भेटला अजित पवारांना;राजकीय तर्कवितर्कांना उधान
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ