नगरमध्ये भाजपचा ‘कल्ला’ ; ‘ते’ चारही उमेदवार पुन्हा रिंगणात उतरणार

टीम महाराष्ट्र देशा : अहमदनगर महानगरपालिकेची रणधुमाळी सुरु असताना, भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे. उमेदवारी अर्जांच्या छाननीवेळी अर्ज बाद झालेल्या चारही उमेदवार पुन्हा रिंगणात उतरणार आहे. कारण मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने या चारही उमेदवारांचे अर्ज वैध ठरवले आहेत. या चार उमेदवारांमध्ये भाजपचे खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र आणि सून यांचा देखील समावेश आहे.

भाजपचे चार आणि राष्ट्रवादी व शिवसेनेचे प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज अवैध ठरवला होता. अखेर औरंगाबाद खंडपीठाने यातील पाच उमेदवारांना दिलासा दिला असून, शिवसेनेचे उमेदवार बाळासाहेब बोराटे यांच्या अर्जावर अद्याप सुनावणी सुरु आहे.
दरम्यान,

कुणा-कुणाचे अर्ज झालेले बाद?
सुवेंद्र गांधी – भाजप
दिप्ती गांधी – भाजप
प्रदीप परदेशी – भाजप
सुरेश खरपुडे – भाजप
योगेश चिपाडे – राष्ट्रवादी

अहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का

काँग्रेस हा मावळतीला आलेला पक्ष आहे,पंकजा मुंडेंचा घणाघात

सत्ताप्राप्तीसाठी शिवसेनेला सोबत घ्या,फडणवीसांची पक्षश्रेष्ठींना कळकळीची विनंती