Share

Chhagan Bhujbal | “महाराष्ट्र सदन कितना सुंदर, पर बनानेवाला अंदर”; भुजबळांनी व्यक्त केली खंत

मुंबई : छगन भुजबळ यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी छगन भुजबळ यांनी आपला संघर्ष मांडला. या कार्यक्रमाला शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार, पारुख अब्दुला यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी मनातील खंत बोलून दाखवली.

ते म्हणाले, माझ्यावर अनेक आरोप झाले, एक काम तर शंभर कोटीचं होतं पण आरोप करणारे म्हणाले हजार कोटी खाल्ले. दिल्लीतले लोक म्हणायचे की, महाराष्ट्र सदन कितना सुंदर है पर बनानेवाला अंदर है”,  त्यांच्या या वाक्यांनंतर सभागृहात हास्यकल्लोळ झाला. ते पुढे म्हणाले, अडीच वर्षे जेलमध्ये जाऊन आलेल्या माणसाला, सरकार बनल्यानंतर पवार साहेबांनी मंत्रीपदाची शपथ दिली. मी स्वत:ला भाग्यवान समजतो.

छगन भुजबळ म्हणाले, “मी आणि माझा भाऊ आम्ही लहान होतो. त्यावेळी भाजीपाला आणायला पहाटे तीन वाजता बाजारात जायचो. तिथे जाऊन थोडी भाजी द्या हो म्हणत भाजीपाला गोळा करायचो आणि ती भाजी माजगावच्या घरासमोरील फुटपाथवर विकायचो. भाजी बाजार लांब असायचा. त्यावेळी टांगे असायचे. या टांग्यांना मागे धरायला जागा असायची. आम्ही गुपचूप जाऊन टांग्याच्या मागे लटकायचो. काही खोडसाळ लोक टांगेवाल्याला सांगायचे आणि टांगेवाला चाबूक मारायचा. तेव्हा आम्ही दोघेही कळवळायचो.”

कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील छगन भुजबळ यांच्यावर स्तुतीसुमने उधळत त्यांचा प्रवास सांगितला. पवार म्हणाले, गेली अनेक वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात छगन भुजबळ हे कणखर नेते आहेत. नाशिकसारख्या शहरात त्यांचा जन्म झाला. भाजीविक्रीचा व्यवसाय होता. मावशीचे वात्सल्य त्यांना लाभले त्यांच्याच आशिर्वादाने ते मोठे झाले. त्यांना खूप खस्ता खाव्या लागल्या. भायखळ्यात भाजीचे दुकान त्यांना चालवावे लागले.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : छगन भुजबळ यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी छगन भुजबळ यांनी …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now