राहूरीतील अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी अखेर सापडली ; आरोपी गजाआड.

पारनेर / स्वप्नील भालेराव : वडलांसमोर वाळू तस्करांनी अपहरण केलेली मुलगी अखेर 44 तासांनंतर सापडली आहे. पारनेरच्या भाळवणी गावात ही मुलगी सापडली असून आरोपी सागर बर्डेला पोलीसांनी ताब्यात घेतलय.

दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री वाळू तस्कर किशोर माळी व सुभाष माळी यांनी साथीदारांच्या सोबत घराबाहेरील अंगणात आईवडीलांसोबत झोपलेल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून उचलून नेले होते. हा प्रकार सर्व वडीलांसमोर घडल्याने त्यांनी आरडाओरडा केल्याने अपहरणकर्त्यांनी पोबारा केला.

किशोर माळी हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर राहूरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. बऱ्याच मुलींचे अपहरण करून त्यांच्यावर अत्याचार केलेत असे स्थानिक नागरिक सांगतात. ह्या प्रकारात सर्व स्तरातून दबाव वाढल्याने पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले.पोलीसांनी तातडीने तपासाची चक्रे फीरवली. राहूरी पोलीस ठाण्याचे अधिकारी प्रमोद वाघ यांनी कारवाई करत पारनेरच्या भाळवणी गावातून मुलीची सूटका करून आईवडीलांकडे सुपूर्त केले. या प्रकरणात पोलीसांनी सागर बर्डे ला ताब्यात घेतले असून अजून कोणाकोणांचा समावेश आहे याचा छडा पोलीस टीम लावत आहे.