राजुरी मध्ये कृषीदूतांचे आगमन ; ग्रामस्थांनी केले स्वागत

टीम महाराष्ट्र देशा : राहता तालुक्यातील राजुरी येथे सुलोचना बेल्हेकर सामाजिक व बहुउद्देशीय शिक्षण संस्थाचे कृषी महाविद्यालय भानसहिवरे येथील प्रशिक्षणार्थी कृषिदूतांचे आगमन झाले आहे.यावेळी सरपंच सुरेश कसाब ,उपसरपंच ग्रामस्थ व शेतकर्यांनी उत्साहात स्वागत केले.यावेळी कृषिदूत शेखर मुरकुटे यांनी आपले हेतू शेतकऱ्यांना सांगितले. प्रात्यक्षिके करण्यासाठी गावातील काही शेतकऱ्यांची निवड केली आहे. शेतकऱ्यांनी देखील कृषिदूतांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अतुल दरंदले प्रा.मोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद गडाख, शेखर मुरकुटे, हेमंत पाटील,महेश दहिफळे,मानिकांत नायडू,ओंकार पाटील,यांनी शेतकऱ्यांना ग्रामीण कृषी अनुभव अंतर्गत शेतातील विविध समस्या व विविध निरसन, माती परीक्षण, जलसंवर्धनाचे महत्त्व, बीज प्रक्रिया व विविध नवीन शेती विषयक संकल्पना आदी शेतीविषयक विषयावर कृषिदूत शेतकऱ्यांशी संवाद साधून माहिती देणार आहेत.