fbpx

अखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला

ncp

अहमदनगर- महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती राष्ट्रवादीद्वारे बुधवारी (१४ नोव्हेंबर) घेतल्या जाणार आहेत. आधी या मुलाखती सोमवारीच होणार होत्या. पण काही कारणाने त्या दोन दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून मनपा निवडणूक लढवू इच्छिणारे १२९ जणांचे अर्ज आले आहेत. या सर्वांच्या मुलाखती घेऊन अंतिम उमेदवार निवड केली जाणार आहे. यासाठी सोमवारी बैठक नियोजित होती. ती आधी मंगळवारपर्यंत व आता बुधवारपर्यंत पुढे ढकलली गेली आहे.

या दिवशी सकाळी ११ वाजल्यापासून राष्ट्रवादीच्या कार्यालयात प्रदेश निरीक्षक अंकुश काकडे यांच्यासह १६जणांची कमिटी इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहे. दरम्यान, याच दिवशी मुंबईत काँग्रेसचीही बैठक होणार असून, दोन्ही काँग्रेसच्या जागा वाटपाचा फैसला तेथे होणार असल्याचे सांगितले जाते.