वांगी पिकासाठी जाणून घ्या अनुकूल हवामान

टीम महाराष्ट्र देशा : कोरडया आणि उष्ण हवामानामध्ये वांग्याची वाढ चांगली होते. ढगाळ हवामान व एकसारखा पाऊस वांगी पिकाला मानवत नाही. सरासरी 13 ते 21 सेल्सिअस तापमानाला वांग्याचे पिक चांगले येते.

सर्व प्रकारच्या हालक्या ते भारी जमिनीत वांग्याचे पिक घेता येते परंतू सुपिक चांगला पाण्याचा निचरा होणा-या मध्यम काळया जमिनीमध्ये वांग्याचे झाड जोमाने वाढते. जमिनीचा सामू 6 ते 7 असल्यास पिकाची वाढ चांगली होते. नदीकाठच्या गाळवट जमिनीत वांग्याचे उत्पादन चांगले येते.

मुख्य शेतात रोपांची लागवड करण्यापूर्वी जमीन उभी आडवी नांगरून आणि कुळवून भुसभुशीत करावी. कुळवाच्या शेवटच्या पाळीसोबत दर हेक्टरी 30 – 50 गाडया शेणखत जमिनीत पसरवून मिसळून घ्यावे.

वांग्याची लागवड तिनही हंगामात करता येते. खरीप बियांची पेरणी जूनच्या दुस-या आठवडयात आणि रोपांची लागवड जूलै, ऑगस्टमध्ये केली जाते. रब्बी किंवा हिवाळी हंगाम-बियांची पेरणी सप्टेबर अखेर करतात आणि रोपे आक्टोबर-नोव्हेंबरमध्ये लावतात. उन्हाळी हंगाम–बी जानेवारीच्या दुस-या आठवडयात पेरून रोपांची लागवड फेब्रूवारीत करतात.

महत्वाच्या बातम्या