‘उद्धव ठाकरे घर सोडा आणि बाहेर पडा’ म्हणणाऱ्या मनसेला शिवसेनेचं जोरदार प्रत्युत्तर

uddhav thakrey vs raj thakrey

मालेगाव : परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमशान घातले आहे. पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. खर तर मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून लोकांना धीर देणे अपेक्षति होते मात्र घरात बसून मुख्यमंत्री कारभार हाकत असल्याने जनतेमध्ये नाराजी वाढू लागली आहे.

राज्यात परतीचा पाऊस, वादळीवारे आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. पिकांची आणि मालमत्ता नुकसानीबाबत माहिती घेतानाच त्यांनी सर्व यंत्रणांना मनुष्यहानी होऊ नये यासाठी सतर्क राहण्याचे निर्देशही दिले आहेत मात्र तरीही लोकांमध्ये नाराजी वाढतच आहे.

याच मुद्द्यावरून मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा, आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो पण आता शेतकऱ्यांचे अतिवृष्टी मुळे झालेले हाल ‘online’ बघता येणार नाही, थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा व त्यांना त्वरित आर्थिक मदत दया, अन्यथा लोकांचा ‘ठाकरे’ नावावरील विश्वास उडेल,’ असा टोला बाळा नांदगावकरांनी मुख्यमंत्र्यांना लगावला होता.

यावर कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “माझ्यासारखे कार्यकर्ते ज्या ज्या ठिकाणी घटना घडत आहेत, त्या-त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. पाहणी करुन त्याचं रिपोर्टिंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करत आहोत. दर आठवड्यात कॅबिनेट बैठकीत यावर चर्चा होतेच. मला संबंधितांना सांगायचे आहे की एक ते दीड महिन्याच्या कालावधीत कृषी विभाग आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी 6 वेळा बैठका घेतल्या आहेत. त्याचं प्रारुप तयार करुन लवकरच त्यावर अंमलबजावणी होणार” असल्याचे दादाजी भुसेंनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-