कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन

मुंबई: राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं आज दुख:द निधन झालं.ते ते 67 वर्षांचे होते. हृदयविकाराच्या धक्क्यामुळे त्यांना आज पहाटे मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पहाटे 4.32 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाने राज्याने एक मोठ राजकीय नेतृत्व गमावल्याची भावना आहे.

पांडुरंग फुंडकर यांच्या अकाली निधनाने भाजपसह सर्वांनाच धक्का बसला. फुंडकर आजारी नव्हते. मात्र त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि तिथेच त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

राज्यात भाजपच्या विस्तारामध्ये त्याचं खूप मोठं योगदान होतं. ग्रामीण आणि शेती प्रश्नाची जाण असल्याचा नेता म्हणून फुंडकर राज्यात परिचीत होते.फुंडकर यांनी काही काळ भाजपचं प्रदेशाध्यक्षपदही भूषवलं होतं.

You might also like
Comments
Loading...