fbpx

अजित दादांच्या आदेशामुळे बारामतीत आलो ; अनिल बोंडे

टीम महाराष्ट्र देशा :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित दादांनी आदेश दिल्यामुळे बारामती पाहायला आलो, नसता इथं झालेलं काम पाहण्यापासून मुकलो असतो, असे वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले. अनिल बोंडे हे बारामतीतील कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी महाविद्यालयाला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

बारामती येथील कृषी विकास संस्थानच्या कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय आणि कृषीविषयक कामांची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे आले होते, दरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून प्रत्येकाने काम केलं पाहिजे, असे म्हणत अजित दादांनी बारामतीत येण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे मी आज इथे आलोय. आलो नसतो तर बारामतीत होत असलेलं काम पाहण्यापासून मुकलो असतो. असे अनिल बोंडे यांनी म्हंटले.