कृषी व पर्यावरण एकाच नाण्याच्या दोन बाजू – अण्णा हजारे

anaa hajare

टीम महाराष्ट्र देशा: जगातील लोक हे पर्यावरणामुळे अस्वस्थ आहेत. पर्यावरणाचे शोषण होत आहे. कुठल्याही गोष्टीची शाश्‍वती राहिलेली नाही. शोषणामुळे प्रदुषण वाढले आहे. त्याचप्रमाणे कृषी क्षेत्रातही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. निसर्गाकडे दुर्लक्ष केल्यामुळे सेंद्रिय शेती नजरेआड झाली असून, रासायानिक खतांच्या असंतुलित व अतिवापरामुळे जमिनीचं आरोग्य बिघडलं आहे. त्यामुळे विषमुक्त अन्न मानवाच्या शरीरात स्लो पॉयझनचे काम करीत आहे. कृषी व पर्यावरण एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.

जिल्हा कृषी विभाग, आत्मा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने खत साक्षरता अभियान, कीड व्यवस्थापन, उत्पन्न वाढ याविषयी कार्यक्रमाची सुरुवात आज जेष्ठ समाजसेवक पद्मभूषण डॉ.अण्णासाहेब हजारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आली. यातूनच माती परीक्षण, पिकांना वापरण्यात येणारी निरनिराळी खते, एकात्मिक कीड व्यवस्थापन याविषयी व अन्य कृषी विषयक व उत्पादन वाढीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक पंडितराव लोणारे, आत्माचे जिल्हा प्रकल्प संचालक भाऊसाहेब बऱ्हाटे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ.अनिल दुर्गुडे, डॉ.नंदकुमार भुते, तालुका कृषी अधिकारी रामदास दरेकर, अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व गावांतील कृषिमित्र उपस्थित होते. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक पंडितराव लोणारे यांनी मार्गदर्शनाबरोबर कृषी विभागाच्या सर्व योजनांची माहिती सांगितली.

Loading...

पुढे बोलताना श्री. हजारे म्हणाले की, पर्यावरणाचा भक्कम करायचं असेल, तर कृषी क्षेत्राला बळकट करावं लागणार आहेर. कृषी पर्यावरणाचा भाग आहे. कृषीची शक्ती वाढली पाहिजे. शेतकऱ्यांनी जागृत व्हायला हवे. जमिनीचे आरोग्य सुधारवायचं असेल, तर जमीन आरोग्य पत्रिकेनुसार सेंद्रिय शेती करावी. स्वतःही विषमुक्त अन्न खा व ग्राहकांनाही विषमुक्त अन्न द्या. गावरान गायींचे संवर्धन करा. पैसा हे जीवनाचं ध्येय नाही. ईश्‍वराने मनुष्य जन्म दिला आहे. तो पैशासाठी नाही. पैसा हा जीवन चरितार्थाचे साधन आहे. जीवनात थोडासा त्याग केल्याशिवाय प्रगती होत नाही, असे ते म्हणाले.

यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब  म्हणाले की, शेतकर्‍यांमध्ये खत साक्षरता व्हायला हवी. प्रत्येक शेतकर्‍याने जमीन आरोग्य पत्रिका काढून त्यानुसार शेती करावी. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे यांनी कृषीच्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. अनिल दुरगुडे यांनी खत साक्षरता या विषयावर, तर डॉ. एन. के. भुते यांनी गुलाबी बोंडअळी एकात्मिक कीड व्यवस्थापन यावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका कृषी अधिकारी रामदास दरेकर यांनी केले. आभार देवेंद्र जाधव यांनी मानले. राळेगण येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.

अहमदनगर जिल्ह्याने विषमुक्त अन्न निर्माण करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले असून सेंद्रिय शेती करण्याकडे जिल्ह्याने वाटचाल सुरू केली आहे. त्याचे पहिले पाऊल जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी येथे पडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास दरेकर यांनी केले. प्रास्ताविक आत्माचे जिल्हा प्रकल्प संचालक भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले, आभार उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी मानले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
'माझे पप्पा' हा निबंध लिहून सर्वांच्या डोळ्याला पाणी आणणाऱ्या 'त्या' मुलाची धनंजय मुंडेंनी घेतली दखल
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने