कृषी कायदे शेतीमध्ये सुधारणा करण्यासाठी महत्त्वाचे ठरतील- आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

वॉशिंग्टन: केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात २ महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. दरम्यान, आज दुपारी 12 वाजता शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात पुन्हा एकदा बैठक झाली. विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाने नव्या कृषी कायद्यांना तूर्तास स्थगिती दिल्यानंतर शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्या होणारी ही पहिलीच बैठक आहे. त्यामुळे या होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या पार्श्वभूमीवर जगभरातून देखील शेतकरी आंदोलनाच्या आणि कृषी कायद्यासंदर्भात बोललं गेलं. यावेळी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ने देखील कृषी कायदे हे शेतीमध्ये सुधारणा करण्यासाठी महत्त्वाचे ठरतील असे म्हटले आहे. मात्र यामध्ये वाईट परिणाम होणाऱ्या घटकांसाठी आणखी सुधारणा करण्याची गरज असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ने म्हटलं.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी चे कम्युनिकेशन डायरेक्टर गैरी राईस यांनी गुरुवारी सांगितलं की, कृषी कायदे हे दलालांची भूमिका कमी करतील. त्यामुळे ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळेल. तर शेतकऱ्यांना थेट विक्रेत्यांपर्यंत पोहोचता येईल. अस त्यांनी यावेळी सांगितल.

महत्वाच्या बातम्या