कृषिकन्यांनी साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’

टीम महाराष्ट्र देशा : दौंड तालुक्यातील नांदूर येथे , कृषि महाविद्यालय पुणे येथील प्रशिक्षणार्थी कृषी कन्यांंचे आगमन झाले आहे. गावकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. दिनांक 21 जुन रोजी त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत योगदिनानिमित्त शाळेत कार्यक्रम आयोजीत केला होता. त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेचे मुख्याध्यापक विजय ठोबरे यांनी मार्गदर्शन केलं.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रमोद रसाळ ,केंद्र प्रमुख डॉ. हसबनिस, कार्यक्रम अधिकारी डॉ.सुनीता वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिकन्या सुरेखा दराडे, हर्षदा भदाणे, सुप्रिया वाकळे, कांचन पाचकर, आश्विनी तायडे,मोहिनी सागर, लता मुंडे यांनी हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा केला

या प्रसंगी कृषिकन्यांनी शेतकऱ्यांना ग्रामीण कृषी अनुभव अंतर्गत शेतातील विविध समस्या व विविध निरसन, माती परीक्षण, जलसंवर्धनाचे महत्त्व, बीज प्रक्रिया आदी शेतीविषयक विषयावर संवाद साधून मार्गदर्शन केले. यापुढे पुढील काही दिवस या कृषीकन्या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना शेतीविषयक अनेक उपक्रमांची माहिती देणार आहेत.

दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता.

संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.