नागराज मंजुळेंना आहे ‘या’ अभिनेत्रीला पडद्यावर बघण्याची उत्सुकता

मुंबई : अवघ्या महाराष्ट्राला ज्या सैराट’ सिनेमाने वेड लावलं त्याचा हिंदी रिमेक असणारा ‘धडक’ हा सिनेमा येत्या २० जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आपल्या सिनेमातून पारंपरिक सिनेमाची चौकट मोडून प्रेक्षकांना वेगळ्या सिनेमाची वाट दाखवली. या सिनेमाला स्वतः नागराजने खास शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देताना नागराज ने जान्हवी कपूरला पहील्यांदा पडद्यावर बघण्यासाठी मी उत्सुक असल्याचं आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

नागराजने शुभेच्छा देताना नेमकं काय म्हटलं आहे ?

उद्या सैराटवर आधारित असलेला हिंदी सिनेमा धडक रिलीज होतोय.
धडक टीम आणि झी ला मनपूर्वक सदिच्छा !!

मी लहानपणापासून श्रीदेवीजींचा खूप मोठा फॅन आहे.
त्यामुळे खास करून जान्हवी कपूरला माझ्या मनःपूर्वक सदिच्छा.जान्हवीला पहील्यांदा पडद्यावर बघण्यासाठी मी उत्सुक आहे.

दूध दरवाढीवर तोडगा नाहीच; पुण्यात दूध कोंडी होण्याची शक्यता

आयएएस अधिकाऱ्याने दोन जणांना चिरडले