अखेर ‘अग्निहोत्र 2’चा मुहूर्त ठरला

blank

टीम महाराष्ट्र देशा : ‘अग्निहोत्र -२’ मालिकेची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना मालिकेत नवीन काय घडणार या विषयी उत्सुकता लागली आहे. नुकताच वाहिनीनं एक प्रोमो शेअर केला आहे. यात अभिनेते शरद पोंक्षे दिसत आहेत.

‘अग्निहोत्र’ मालिकेच्या पहिल्या पर्वाप्रमाणेच याही पर्वाची कथा श्रीरंग गोडबोले यांची असून भीमराव मुडे दिग्दर्शन करणार आहेत. ‘१० वर्षांचा काळ लोटला तरी अद्यापही ‘अग्निहोत्र’ ही मालिका प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

२ डिसेंबर पासून रात्री १० वाजता ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.‘अग्निहोत्र २’ ही मालिका स्टार प्रवाहवर २

डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री दहा वाजता पाहायला मिळणार आहे. ‘अग्निहोत्र 2’चा प्रोमो स्टार प्रवाहवर प्रदर्शित करण्यात आला.

दरम्यान, शरद पोंक्षे यांनी अग्निहोत्रच्या पहिल्या पर्वात ‘महादेव’ ही व्यक्तिरेखा साकारली होती. अग्निहोत्र १ चे दिग्दर्शन अभिनेते-दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी केले होते. ‘अग्निहोत्र २’ची कथा श्रीरंग गोडबोले यांची असून भीमराव मुडे या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या