मुंबई: राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (State Housing Minister Jitendra Awhad) यांनी ओबीसींसंबंधी केलेल्या एका वक्तव्यावरुन सध्या ते चांगलेच चर्चेत आहेत. या वक्तव्यानंतर मात्र भाजप आक्रमक झाली असून जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानाबाहेर भाजपने आंदोलन केले. दरम्यान पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. यावरच आता जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काही गैर प्रकार घडू नये यासाठी पोलीस नेहमी सावध असतात. प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असते, त्यामुळे पोलीस दोन्ही बाजूने सांभाळत असतात. तसेच मी कधीच बेसावध नसतो आणि मी डगमगणारा माणूस नाही. मी जे काही बोलतो ते मनापासून बोलतो. ‘मुंह में राम बगल में छुरी’ असा आपला स्वभाव नाही. असं ते म्हणाले आहेत.
तसेच त्यांनी केलेल्या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, तो इशारा नव्हता…अन्यथा मी घरातून निघून जाईन असं म्हणणं होतं. तुम्ही त्याला इशारा समजत आहात. मला मारलं बिरलं तर लफडं व्हायचं म्हणून तर मी ९ वाजता घऱ सोडून आलो. माझ्याबद्दल प्रेम आहे म्हणून कार्यकर्ते जमले आहेत. अशी प्रतिक्रीय त्यांनी दिली आहे.
काय होते ‘ते’ ट्वीट?
उद्या माझ्या घरावर मोर्चा येणार आहे असे समजले. त्यासाठी 2 बस पुण्याहून मागविण्यात आलेल्या आहेत. एकाला सांगितले आहे कि तू माजीवाडा नाक्यावर उतर आणि दुसऱ्याला कॅडबरी जंक्शन जवळ उतरायला सांगितले आहे. पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा. अन्यथा…… जय भीम! असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले होते.
जितेंद्र आव्हाड यांचे ‘ते’ वक्तव्य-
‘ओबीसींवरती माझा काही फार विश्वास नाही. कारण जेव्हा मंडळ आयोग आला तेव्हा मंडळ आयोगाचं आरक्षण ओबीसींसाठी होतं, पण जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा ओबीसी लढायला मैदानात नव्हते, कारण ओबीसींना लढायचं नसतं’ असे वक्तव्य आव्हाड यांनी केले होते.
महत्वाच्या बातम्या:
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक; उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या ‘या’ सूचना
- “अमाप माया सोबत घेऊनी, माय चालली अनाथ करुनी!”, सदाभाऊंची भावनिक पोस्ट
- “धनंजय मुंडेंचा आपल्याच सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांना हरताळ, हे सरकार नाही तमाशाचा फड”
- ‘खुर्चीवर कोण बसलं होतं, याचा शोध लावला पाहिजे’; रावसाहेब दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
- बाईकवर किस करणाऱ्या ‘त्या’ तरुणाला अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या