Share

Ravi Rana । “बच्चू कडू सोंगाड्या, तोडीबाज, नौटंकीबाज” ; रवी राणा यांचा आक्रमक पलटवार

(Ravi Rana) अमरावती : बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधत सडकून टीका केली होती. महाठग खिसे कापणारे आणि नंतर किराणा वाटत फिरणारे अशी राणा दाम्पत्याची ओळख आहे, अशी घणाघाती टीका बच्चू कडू (Bachhu Kadu)  यांनी राणा दाम्पत्यावर केली होती. बच्चू कडूंच्या या टीकेला रवी राणा (Ravi Rana) यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

रवी राणा म्हणाले, मला असं वाटते बच्चू कडू हा सोंगाड्या आहे. याला कुठल्याही प्रकारची मान मर्यादा नाही. बच्चू कडू जे आंदोलन करतो ते फक्त तोडीसाठी करतो. तोडीबाज म्हणून त्याची ओळख असल्याचं म्हणत रवी राणा यांनी बच्चू कडू यांना टोला लगावलाय. माझ्यावर आरोप करणाऱ्यांना मला सांगायचे आहे. रवी राणामध्ये धमक आहे. रवी राणा किराणा वाटतो, गरीबांवर उपचार करुन देतो. मुलांना शिक्षणासाठी मदत करतो. आदिवासी कुटुंबाना रवी राणा स्वत:चा पगार देतो, असंही ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले, गुवाहाटीला जाणाऱ्या बच्चू कडूने आरोप करताना दहा वेळा विचार करावा. विधानसभा आली तर त्यांना दमडी पाहीजे, राज्यसभा आली तर त्यांनी दमडी पाहीजे. कुण्या सरकारला पाठिंबा द्यायचा तर दमडी पाहीजे. गुवाहाटीला जायचं आहे तर दमडी पाहीजे. बच्चू कडू यांचे जीवन पैसा आहे. त्यांनी लोकांसाठी जगून दाखवावे. ज्या पद्धतीने तू बोलतो जरा खिशामध्ये हात टाकून दाखव आणि एखाद्या गरीबाला मदत करुन दाखव. रवी राणा किराणा वाटतो तू एक किलो साखर तर वाटून दाखव. बच्चू कडू नौटंकीबाज असल्याचं रवी राणा (Ravi Rana) यावेळी बोलताना म्हणाले.

काय म्हणाले होते बच्चू कडू?

महाठग खिसे कापणारे आणि नंतर किराणा वाटत फिरणारे अशी राणा दाम्पत्याची ओळख आहे, अशी घणाघाती टीका बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर केली होती. अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात शिंदे गटाचे आमदार व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांची रक्ततुला करण्यात आली होती. या कार्यक्रमात आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर सडकून टीका केली.

महत्वाच्या बातम्या :

(Ravi Rana) अमरावती : बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधत सडकून टीका केली होती. महाठग खिसे कापणारे आणि नंतर …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now