रेल्वे मार्गाच्या चुकीच्या सेर्वेक्षणाच्या विरोधात कुकाना येथील नागरिकांचे अमरण उपोषण

indian railway

टीम महाराष्ट्र देशा- बेलापुर नेवासा शेवगाव गेवराइ बीड परळी या रेल्वे मार्गाच्या चुकीच्या सेर्वेक्षणाच्या विरोधात कुकाना येथील नागरिकांनी 1 डिसेम्बर पासून अमरण उपोषणाचा एल्गार पुकारला असून कुकाणा ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणास ग्रामस्थांच्या वतीने सकाळी दहा वाजता सुरवात करण्यात आली .या उपोषणास परिसरातील व नेवासा शेवगाव तालुक्यातील ग्रामपंचायत ,सरपंच विविध संघटनेच्या पदाधीकार्यानी जाहीर पाठिंबा देवून सरकारचा जाहीर निषेध केला .

याबाबत माहिती अशी की ब्रिटिशांनी सन 1922 मधे वरील रेल्वे मार्गाला मंजूरी देऊन भूमी अधिग्रहण करुण माती भराव पूर्ण केला होता संपादित जमिनीचा मोबदला ब्रिटिशांनी दिल्याने 7/12 उताऱ्यावर रेल्वे ची नोंद करण्यात आली वरील लोहमार्गाचा सर्वे बेलापुर नेवासा शेवगाव पाथर्डी राजुरी रायमोह बीड असा चुकीचा करुण तो न परवडनारा असल्याचा सर्वे रिपोर्ट सादर झाल्याने मूळ रेल्वे मार्ग मागे पडला आहे या रेल्वे मार्गाच्या पूर्णत्वासाठी बेलापुर परळी रेल्वे प्रवासी सेवा संस्था गेली 8/10 वर्षापासून पाठपुरावा करीत आहे परंतु या मार्गाचे काम सुरु होत नसल्याने कुकाना येथील नागरिकांनी अमरण उपोषण केले आहे .