‘राष्ट्रवादीचा’ सरकारविरोधात पुन्हा हल्लाबोल

सुनील तटकरे

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी काँग्रेस मराठवाड्यातून पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात करणार आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासह मराठवाड्यातून या आंदोलनाला सुरवात होणार असल्याचे मुंबईत गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या आढावा बैठकित राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ठ केले.

उस्मानाबादमधील उमरगा येथून १६ जानेवारीपासून या आंदोलनाला सुरवात होणार असून सरकारविरोधात पुन्हा हल्लाबोल करण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत राष्ट्रवादीकडून देण्यात आले आहेत. या आंदोलनाचा शेवट ३१ जानेवारीला औरंगाबादमध्ये होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या आढावा बैठकित विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील, जयदत्त आण्णा क्षिरसागर, आमदार राजेश टोपे, महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.Loading…
Loading...