भाजप विरोधात एकजुटीने लढू आणि जिंकू- अशोक चव्हाण

अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंन्द फडणवीस यांचा जोरदार समाचार घेतला ते म्हणाले की, आणीबाणी नंतरही काँग्रेसचं सरकार देशात होतं. पण भाजप आणि मोदींकडून इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांची बदनामी करण्याचे काम जाणिवपूर्क सुरु आहे. मोदी ४३ वर्षापूर्वीच्या आणीबाणीबद्दल बोलतात मात्र देशात गेल्या चार वर्षापासून अघोषीत आणीबाणी आहे. देशात तणाव निर्माण करुन मतं कशी वाढतील यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. देशात फक्त मी आणि मी पणा सुरु आहे. केंद्रीय मंत्रीमंडळातील मंत्र्यांना अधिकार नाहीत. राज्यातले सरकार बोलण्यात ऑनलाईन कामात ऑफलाईन आहे. कर्जमाफीची घोषणा फसवी आहे. रोज शेतकरी आत्महत्या करत आहेत. नविन पीक कर्ज मिळत नाही. तरुणांना नोक-या नाहीत. व्यापार उद्योग ठप्प झाले आहेत. सरकार फक्त जाहीराचींवर कोट्यवधींची उधळपट्टी करित आहे. भाजपवाले २०१४ ला म्हणत होतं कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? देवेंद्रजी आता तुम्ही सांगा कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा? राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर आहे. हे सरकार बदलल्याशिवाय चांगले दिवस येणार नाहीत. या असंवेदनशील सरकारविरोधात एकजुटीने लढू आणि जिंकू असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.

देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, खा. कुमार केतकर, माजी मंत्री आ. नसीम खान, माजी मंत्री वसंत पुरके यांनीही या मेळाव्याला मार्गदर्शन केले. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, श्रीमती सोनल पटेल, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, माजी मंत्री व अनुसुचीत जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नितीन राऊत, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, शिवाजीराव मोघे, सतेज पाटील, माजी न्यायमूर्ती व काँग्रेस नेते अभय ठिपसे माजी खा. भालचंद्र मुणगेकर यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजपला मिळाली सर्वाधिक देणगी, वाचा कॉंग्रेस-राष्ट्रवादीला किती मिळाली देणगी ?

Gadgil