बंगाल हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भाजप उद्या करणार देशव्यापी धरणे आंदोलन

bjp

नवी दिल्ली : विधानसभा-लोकसभा पोटनिवडणुकांसह ५ राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. देशाचं लक्ष्य असलेल्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने पुन्हा एकदा एकहाती बहुमत मिळवलं असून भाजपला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासारखे नेते प्रचाराच्या रणधुमाळीत उतरवून देखील दोन अंकी जागांवरच समाधान मानावं लागलं आहे.

मात्र आता निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफळल्याचं दिसून येत आहे. कालपासून सुरु झालेल्या या हिंसाचारामध्ये कालपासून ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या मिळत आहे. हा हिंसाचार तृणमूल कॉंग्रेसने घडवून आणली असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलेला आहे. तर याच पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज बंगालमध्ये जाणार आहेत.

तसेच पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भाजपने देशभरात धरणे आंदोलन करणार असल्याची घोषणा जे.पी. नड्डा यांनी केली आहे. हे आंदोलन उद्या ५ मे रोजी देशभर करण्यात येणार आहे. या संदर्भात पक्षाने एक आदेश जारी केला असून कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्याचे निर्देश त्यांनी देखील त्यांनी दिलेले आहेत.

पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात अनेक ठिकाणी भाजपा कार्यालयांमध्ये तोडफोड केल्याच्या बातम्या आल्या आहेत. भाजप कार्यकर्त्यांनुसार टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील विविध कार्यालयांवर तोडफोड आणि बॉम्बस्फोट केले आहेत. राज्यभरातून झालेल्या हिंसाचाराच्या वृत्तांमध्ये राज्यपाल जगदीप धनकर यांनी डीजीपी यांना त्वरित कारवाई करण्याचे व हिंसाचारा विरोधात कठोर उपाययोजना करण्याचे आदेश दिले.

महत्त्वाच्या बातम्या