fbpx

इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणा विरोधात हायकोर्टात दाखल केलेली याचिका घेतली मागे

imtiyaz-jaleel

टीम महारष्ट्र देशा : मोठ्या लढाईनंतर मराठा समाजाला राज्य सरकारकडून आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. मात्र समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाला एमआयएम आमदार इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणा विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती.पण आता इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणा विरोधात हायकोर्टात दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे.

न्या. गायकवाड यांच्या आयोगाचा अहवाल रद्द करत मराठा समाजाच्या १६% आरक्षणाला त्वरित स्थगिती देण्यात यावी, तसेच राज्य सरकारकडून करण्यात आलेला एसइबीसी २०१८ हायदा रद्द करण्याची याचिका जलील यांच्याकडून करण्यात आली होती.त्यामुळे आमदार इम्तियाज जलील यांच्यावर चौफेर टीका होत होत्या. पण आता आमदार जलील यांनी मराठा आरक्षणा विरोधात हायकोर्टात दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे.