मराठा क्रांती मोर्चाकडून पुन्हा आंदोलनाचा इशारा

मुंबई –सरकारनं १५ नोव्हेंबरपर्यंत आरक्षणाची कार्यवाही पूर्ण करण्याची मागणी मोर्चानं पत्रकार परिषद घेऊन केली आहे. अन्यथा २५ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्याचा इशारा ठोक मोर्चा समन्वयकांनी दिला आहे. तसेच हे आंदोलन १ डिसेंबरपासून तीव्र केले जाईल, असेही समन्वयकांनी सांगितले.

सरकारने जी लेखी आश्वासने दिली होती, त्यावर मुख्यमंत्र्यांनी कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. या आश्वासनांत आरक्षण वैधानिक कार्यवाही १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे मान्य केले होते. तसेच गरज पडल्यास विशेष अधिवेशन बोलवू, असे ही मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते. मात्र सरकारला त्याचा विसर पडल्याचे दिसत असल्याचा आरोप लोक मोर्चा समन्वयकांनी केला आहे.

‘शिवस्मारकाचा घाट हा निवडणुकीसाठीचा जुमला, विनायक मेटेंनी केलेली ही स्टंटबाजीच आहे’