गॅसच्या दरांचा पुन्हा एकदा भडका…

 टीम महाराष्ट्र देशा : आंतरराष्ट्रीय बाजारात पेठेत गॅस सिलेंडरच्या किंमतीत मध्यरात्रीपासून वाढ करण्यात आली. अनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत २.७१ रुपयांनी,तर विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत ५५.५० रुपयांची वाढ झाली आहे. दिल्लीत अनुदानित सिलेंडरची वाढलेली किंमत ४९३.५५ रुपये झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली होती आता परत एकदा हि वाढ झाल्याने सर्वसामान्याच्या खिशाला कात्री बसणार आहे. दोन महिन्यात विनाअनुदानित सिलेंडर ११० रुपयांनी महागलं आहे. तर ३१ मे रोजी अनुदानित सिलेंडरची किंमत २.३३ रुपयांनी वाढले होते.

दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाईने सर्वसामान्य जनता आधीच होरपळून निघत असताना त्यात अजूनच भर पडली ती मध्यरात्रीपासून वाढ करण्यात आलेल्या गॅस सिलेंडरच्या किंमतीने. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीत जनता होरपळत असताना आता गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतीने गृहिणींचे देखील बजेट कोलमडणार आहे.

विनाअनुदानित गॅस सिलेंडर महागला!

You might also like
Comments
Loading...