अफजलखान फार झाले; आता एक जिजाऊंचा शिवा पाहिजे- पंकजा मुंडे

pankaja munde

“अंधार फार झाला आता दिवा पाहिजे , अफजलखान फार झाले आता एक जिजाऊंचा शिवा पाहिजे . शतकांच्या यज्ञातून उठली एक ज्वाला , दहा दिशांच्या तेजातून अरुणोदय जाहला . ‘जय भवानी!!, जय शिवाजी !!!.” अश्या शब्दात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

शिवराज्याभिषेक आज उत्साहात साजरा होत आहे. ढोल-ताशे, लेझीम आणि पोवाडय़ांच्या निनादात छत्रपती शिवाजी महाराजांना या वेळी मानवंदना देण्यात येत आहेत. राजकीय नेत्यांनी सुद्धा शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.