झपाटलेला ३ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

after-zapatlela-2s-success-there-will-be-zapatlela-3

१९९३ साली मराठी रूपेरी पडद्यावर झळकलेला आणि प्रचंड यश मिळविलेला सिनेमा म्हणजे झपाटलेला. अनोखी संकल्पना, वेगवान कथा-दिग्दर्शन, त्याला रहस्याची फोडणी, लक्ष्याची धमाल आणि खलनायक तात्या विंचूच्या कायवाया, यामुळे ‘झपाटलेला’ आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

या सिनेमाला रिलीज होऊन आता २० वर्षे उलटून गेली आहेत. इन्स्पेक्टर महेश जाधवच्या गोळीला बळी पडलेला आणि मंत्रशक्तीच्या जोरावर मृत्यूलाही आवाहन देणारा खलनायक तात्या विंचू परत ‘झपाटलेला २ ‘ या नावाने याच संकल्पनेवर महेश कोठारे ‘झपाटलेला २ ‘ हा सिनेमा घेऊन आले होते. आता लवकरच महेश कोठारे झपाटलेला ३ घेऊन येत आहे.

झपाटलेला या चित्रपटाला मिळालेले प्रेक्षकांचे प्रेम पाहाता २०१३ मध्ये महेश कोठारे झपाटलेला २ प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आले होते. झपाटलेला २ या चित्रपटात आदिनाथ कोठारे, महेश कोठारे, सोनाली कुलकर्णी आणि दिलीप प्रभाळकर यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळाल्या होत्या. हा चित्रपट मराठीतील पहिला थ्री डी चित्रपट होता.

या चित्रपटावर निर्माते महेश कोठारे यांनी करोडो रुपये खर्च केले होते. या चित्रपटाला देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. या चित्रपटानंतर आता झपाटलेला ३ कधी येणार याची उत्सुकता या चित्रपटाच्या फॅन्सना लागलेली आहे. झपाटलेला ३च्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. झपाटलेला ३ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा आहे.

महेश कोठारे यांनी नुकत्याच केलेल्या एका ट्वीटमुळे झपाटलेला ३ प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. महेश कोठारे यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये झपाटलेला या चित्रपटाचा फोटो पोस्ट केला आहे आणि त्यासोबत तात्या विंचू लवकरच पुन्हा परतत असल्याचे म्हटले आहे. या त्यांच्या ट्वीटनंतर नेटिझननेदेखील रिप्लाय करून तात्या विंचू परत येण्याची आम्ही आतुरतेने वाट पाहात असल्याचे म्हटले आहे.