भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिका संपुष्टात आली आहे. यजमानांनी कसोटी मालिकेपाठोपाठ एकदिवसीय मालिकेवरही कब्जा केला आहे. दक्षिण आफ्रिकेने वनडे मालिकेत टीम इंडियाचा पराभव करून सर्व सामने जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती. दक्षिण आफ्रिकेने शेवटचा सामना ४ धावांनी जिंकला. एके काळी विराट कोहली टीम इंडियाला विजयाकडे घेऊन जात होता, पण डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराजने त्याची महत्त्वाची विकेट घेत सामना पलटवला. याशिवाय सामन्यानंतर केशव महाराजने आपल्या इन्स्टा पोस्टने भारतीय प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
सामना संपल्यानंतर सर्व खेळाडू मालिका विजयाचे फोटो आणि पोस्ट अपलोड करत होते. अशा स्थितीत केशव महाराज यानेही एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करत लिहिले की, “आमच्यासाठी ही एक उत्तम मालिका होती. आम्ही कुठून आलो आणि मालिका जिंकली यापेक्षा मला या संघाचा अभिमान वाटू शकत नाही. आता पुन्हा एकत्र येत पुढील आव्हान स्वीकारण्याची वेळ आली आहे. ‘जय श्री राम’.”
केशव महाराज हे भारतीय वंशाचे दक्षिण आफ्रिकेतील खेळाडू आहेत. या मालिकेत त्याने उत्तम काम केले आहे. त्याने तीनही सामन्यांमध्ये १-१ बळी घेतले, त्याने विराट कोहलीला शेवटच्या दोन सामन्यांमध्ये दोनदा, एकदा शून्यावर आणि एकदा ६५ धावांवर बाद केले. याशिवाय पहिल्या एकदिवसीय सामन्यात शिखर धवनची मोठी विकेट आपल्या नावावर केली आणि सामना आपल्या संघाकडे वळवला.
महत्वाच्या बाचम्या:
- IND vs SA : भारतीय संघाला क्लीन स्वीप केल्यानंतर आफ्रिकेच्या कर्णधार बावुमाचे मोठे वक्तव्य!, म्हणाला…
- गावगुंड नाना पटोले यांनी औरंगाबादेत येऊन दाखवावे त्यांचे कपडे फाडू; भाजपकडून पटोलेंविरोधात आंदोलन!
- सहकारी साखर कारखान्यांच्या भ्रष्टाचार प्रकरणी अण्णा हजारेंचे अमित शहांना पत्र
- “राम मंदिराच्या लढ्यात सगळ्या केसेस शिवसैनिकांनी अंगावर घेतल्या”, भाजपच्या टीकेला राऊतांचे प्रत्युत्तर
- शरद पवार कोरोना पॉझिटिव्ह; पंतप्रधान नरेंद्र मोदी फोन करत म्हणाले….