बिहार जिंकल्यानंतर देवेंद्र फडणवीसांकडे आता पश्चिम बंगालची जबाबदारी ?

devendra fadnvis

कोलकत्ता : भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पक्षाने पुन्हा एकदा मोठी जबाबदारी सोपवली असल्याची माहिती सद्य मिळत आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर पक्षाने आता त्यांच्यावर पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूक प्रचाराची जबाबदारी सोपवली असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आता पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे. मागील अनेक दिवसांपासून फणडवीसांना राष्ट्रीय राजकारणात स्थान देणार अशी चर्चा होती. या चर्चा आता खऱ्या होताना दिसत आहेत. बिहारनंतर फडणवीस यांच्याकडे पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी प्रभारीपदाची जबाबदारी सोपवली असल्याची चर्चा सुरु आहे.

देवेंद्र फडणवीस सोमवारी पश्चिम बंगालमध्ये देखील दाखल झाले आहेत. त्यांनी याठिकाणी परिवर्तन यात्रेला सुरू केली आहे. याचे काही फोटो फडणवीसांनी त्यांच्या ट्विटर हॅँडलवरून शेअर केले आहेत, त्यात पश्चिम बंगालमधील सतगाचिया विधानसभा मतदारसंघात अम्तालापासून परिवर्तन रॅली सुरू केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

पश्चिम बंगालच्या जनतेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल प्रेम आणि स्नेह बघायला मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच ममता बॅनर्जी यांचे सरकार पश्चिम बंगालमध्ये पुन्हा परत येणार नाही, असं सांगत येथे हिंदु नागरिक दुय्यम दर्जाचा बनला असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. पश्चिम बंगालमध्ये शेतकऱ्यांना स्वत:च्या राजकारणासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधीपासून वंचित ठेवण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

 

महत्त्वाच्या बातम्या