वायनाड नंतर अमेठीतूनही राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

blank

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे आज अमेठी लोकसभा मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. तर त्याआधी राहुल गांधी यांनी प्रचंड गर्दी करत अमेठी मध्ये रोड शो करून शक्ती प्रदर्शन केले आहे. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी उपस्थिती लावून आपला पाठींबा दर्शविला आहे तर कार्यकर्त्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला सजवण्यात आले आहे.

या रोड शो मध्ये कॉंग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी पती रोबर्ट वाड्रा आणि मुलांसोबत हजेरी लावली आहे. तर राहुल गांधी यांचा अर्ज दाखल करते वेळी सोनिया गांधी देखील उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान अमेठी या काँग्रेसच्या परंपरागत जागेवर बीजेपीने राहुल गांधी यांना टक्कर देण्याकरिता स्मृती इरानी यांना मैदानात उतरवले आहे.त्यामुळे भाजप कढून देखील या जागेसाठी जोरदार प्रचार चालू आहे. तसेच या लोकसभा निवडणुकी मध्ये राहुल गांधी हे केरळ मधील वायनाड या लोकसभा मतदार संघातून देखील लढणार आहेत. ५ एप्रिल रोजीच वायनाड येथे शक्ती प्रदर्शन करत राहुल गांधी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.