विकास दुबेला मारल्यावर काही जण असा गळा काढत आहेत जसा यांचा बापच गेला’

blank

मुंबई : कुख्यात गुंड विकास दुबेचा पोलिसांकडून खात्मा करण्यात आला आहे. विकास दुबेला काल (दि.9) उज्जैनमधून अटक करण्यात आली होती. उत्तरप्रदेश पोलीस दुबेला कानपूरला घेऊन जात असताना पोलिसांची गाडी पलटी झाली. यावेळी दुबेने पोलिसांची बंदूक घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. यात पोलिसांकडून त्याचा खात्मा झालेला आहे.’

यानंतर अनेक जण माध्यमांमधून उत्तरप्रदेश पोलिसांचे अभिनंदन करत असून काही जणांनी मात्र या मागे काही काळेबेरे असण्याची शंका व्यक्त केली आहे. त्याच्या चौकशीतून राजकारण्यांच्या अनेक गुप्त गोष्टी बाहेर आल्या असत्या त्यामुळे नाट्यमय एन्काउंटर मध्ये विकास दुबेला ठार मारण्यात असल्याचे सोशल मीडिया मार्फत अनेक जण प्रतिक्रिया देत आहेत. यावर भाजपा महाराष्ट्र राज्य प्रवक्ता अवधूत वाघ यांनी खरमरीत टीका केली आहे. त्यांनी ट्विटद्वारे , ‘विकास दुबे चा खात्मा झाल्यावर काही जण असा गळा काढत आहेत की जसा काय यांचा बापच मेला’, अशा शब्दांत समाचार घेतला आहे.

दरम्यान, अधिक चौकशीसाठी विकास दुबेला कानपूरला घेऊन जात असताना पोलिसांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाला. त्यावेळी त्याने पोलिसांचं पिस्टल घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला तसंच पोलिसांवर फायरिंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी त्याला मारल्याची बातमी पुढे येत आहे. त्यानंतर विकास दुबेला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांनी चेकअप केलं असता त्याला मृत घोषित केलं गेलं आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

तर, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र पाल सिंह यांचा विकास दुबेकडून करण्यात आलेल्या गोळीबारात मृत्यू झाला होता. त्यांच्या वडिलांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, उत्तर प्रदेश पोलिसांचा मला अभिमान आहे. आज पोलिसांनी जे काही केले आहे त्यामुळे माझ्या आत्म्याला समाधान मिळालं आहे. मी पोलीस प्रशासन आणि योगी सरकारचे आभार मानतो, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या होत्या.

पुणे : थायरोकेअर लॅबला दणका, स्वॅब तपासणी बंद करण्याचे आदेश

शिवरायांचा अपमान करणाऱ्या दिड दमडीच्या अग्रीमाला अटक करा – संभाजी ब्रिगेड

विकास दुबेच्या एन्काऊंटरचे कोणी राजकारण करू नये : संजय राऊत