उद्धव ठाकरेंची एसटी कर्मचारी संपात मध्यस्थी; संप मिटण्याची शक्यता

UDDAV-THEKETRey

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात मध्यस्थी केली आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून राज्यभरात सुरु असणारा एस टी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान काल रात्री उद्धव ठाकरे यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही संपाबाबत चर्चा केली असल्याच बोलल जात आहे.

ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर राज्यात सुरु असलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. आता उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी केल्याने एसटी कर्मचाऱ्यांकडून आज संप मागे घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच संप मिटल्यानंतर एसटी संघटनांचे कर्मचारी तसंच नेते मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ आणि उद्धव ठाकरेंच्या ‘मातोश्री’वर जाऊन भेट घेणार आहे.