दोन तासानंतरही अग्नी तांंडव सुरूच

टीम महाराष्ट्र देशा : चेंबुरच्या बीपीसीएल कंपनीत आज दुपारी ३ च्या सुमारास भीषण स्फोट झाला. स्फोटानंतर परिसरात आग आणि धुराचे लोळ पसरले आहेत. अग्निशमन दलाच्या १८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून. घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आत्तपर्यंत २१ पेक्षा जास्तजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तर २० अँब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्या असून परिसरातील वाहतूकही वळवण्यात आली आहे. परिसरात झोपडपट्टी असल्याने मोठी हानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान माहुल गाव हादरून गेले असून परिसरातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हवलण्याचे काम महापालिका कर्मचारी, अग्निशमन दल, पोलीस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते करत आहेत.

दरम्यान, या आगीत 42 कर्मचारी जखमी झालेत तर एक जण गंभीर आहे.  21 जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आगीत कंपनीतील 200 ते 400 कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र, सर्वच कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. तसेच आगीवर 70 टक्के नियंत्रण आणण्यात आले आहे.

चेंबुरच्या बीपीसीएल कंपनीत भीषण स्फोट:

-बीपीसीएलच्या हायड्रो क्रॅकर प्लांटमध्ये स्फोट.
-दोन फोमच्या गाड्या घटनास्थळी दाखल.
-बीपीसीएलचे २१ कर्मचारी जखमी.
-एकाची प्रकृती गंभीर.
-जखमींवर बीपीसीएलच्या क्लिनिकमध्ये उपचार सुरू.
-कंपनीत स्फोट होत असल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अडचणी.
-२० अँब्युलन्स घटनास्थळी दाखल.
-आगीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात यश.

 

मुंबई व कोकण भागातील अतिवृष्टीत आवश्यक ती खबरदारी घ्या : देवेंद्र फडणवीस