fbpx

नाशिक नगरी छगन भुजबळांच्या स्वागतासाठी सज्ज

टीम महाराष्ट्र देशा : राष्टवादीचे नेते आणि माजी पालकमंत्री छगन भुजबळ सुमारे अडीच वर्षांनंतर आता नाशिकमध्ये म्हणजेच आपल्या होमग्राउण्डवर परतणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी नाशिकमध्ये ‘अखेर सत्याचा विजय झाला, नाशिकचा विकास पुरुष नाशिक मध्ये आला’ अशा आशयाचे फ्लेक्स लावण्यात आले आहेत.

महाराष्टसदन घोटाळा तसेच सक्तवसुली संचालनालय यामुळे चोवीस महिने कारागृहात राहिल्यानंतर छगन भुजबळ यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर भुजबळ हे मुंबईतच रुग्णालयात होते. १० जून रोजी त्यांनी पुणे येथील राष्टवादी कॉँग्रेसच्या वर्धापन दिन सोहळ्यात घणाघाती भाषण करून राजकारणातील कमबॅक केले होते.

आता ते आजापासून नाशिकमध्ये येणार असून, दुपारी १२ वाजता पाथर्डी फाटा येथे आगमन झाल्यानंतर शिवछत्रपतींच्या पुतळ्याला तसेच तेथून गणेशवाडीत महात्मा फुले आणि त्यानंतर सीबीएसवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ते कामकाजाला सुरुवात करतील. तेथून जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार असून, त्यानंतर राष्ट्रवादी भवनात गेल्यानंतर कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत.

1 Comment

Click here to post a comment