तुकाराम मुंढेंनंतर आता कर्तव्यदक्ष नांगरे पाटलांची बदली

Vishwas-Nangre-Patil

मुंबई : काही दिवसांपूर्वी नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंच्या बदलीनंतर आता नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचीसुद्धा बदली झाली आहे. गणेशोत्सव पार पडताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 45 अधिकार्यांच्या बदल्यांंवर शिक्कामोर्तब केले. यावेळी नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईच्या कायदा व सुव्यवस्था सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या रिक्त पदावर आयपीएस अधिकारी दिपक पांडे यांना संधी देण्यात आली आहे.

नाशिकच्या आयुक्तपदाचा कारभार नांगरे पाटील यांनी 02 मार्च 2019 रोजी रविंद्रकुमार सिंघल यांच्याकडून स्विकारला होता. त्यानंतर त्यांनी अत्यंत चांंगल्या पद्धतीने नाशिकमध्ये कायदा व सुव्यवस्था संभाळली होती. आता त्यांच्या अशा बदलीने चर्चांना उधाण आलं आहे. आयपीएस, आयएएस अधिकार्यांच्या बदल्या हा नेहमीच वादाचा विषय राहीलेला आहे. विषेशतः मागील काही वर्षांपासून अधिकारी तुकाराम मुंढेंच्या बदल्यांवरुन वादंग झाली आहेत. मुंढेंच आणि संबंधित महापालिकांतील सत्ताधारी पक्षाचे खटके नेहमी उडतात, असा सर्वांचा अनुभव आहे. नांगरे पाटलांच्या बदलीनंतर आता ते मुंबईत कशाप्रकारे काम करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

काँग्रेसच्या ‘त्या’ नाराज नेत्यांनी भाजपा, आरपीआयमध्ये यावं : रामदास आठवले

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची देखील मुंबईमध्ये बदली केली आहे. तुकाराम मुंढे यांनी आता पर्यंत नागपूर जिल्हापरिषद सीईओ, सोलापूर जिल्हाधिकारी, पंढरपूर मंदिर समिती चेअरमन, नवी मुंबई महापालिका आयुक्त, पुण्यात पीएमपीएमएल अध्यक्षपदी, नाशिक, मंत्रालय, नागपूर महापालिका आयुक्त आदी पदभार सांभाळले असून त्यांची वारंवार बदली केली जाते. ते जिथे जातात तिथे अवैध व्यवसाय धंदे, अनियमितताला चाप लावतात, अशी त्यांची ओळख आहे.

पूर्व विदर्भात पुरामुळे लोकांचे संसार उघड्यावर, विरोधी पक्षाच्यानेत्यांनी केली ही मागणी