नागपूर : बीड जिल्ह्यातील परळीतील पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात जीवन संपवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही तरूणी पुण्यात शिकण्यासाठी आलेली होती. मागील आठवड्यात पूजाने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवले होते. यानंतर महाविकास आघाडीमधील वनमंत्री संजय राठोड यांच्या या मुलीशी संबंध असून काही कथित कॉल रेकॉर्डिंग्स देखील समोर आले होते.
परंतु या सर्व प्रकरणानंतर गेले अनेक दिवस संजय राठोड गायब होते. गेले १४ दिवस नॉट रीचेबल असलेले वनमंत्री संजय राठोड उद्या पोहरादेवीला येणार असल्याची माहिती देवस्थानाच्या महंतांनी दिली होती. या वरती आता जिल्हाअधिकारी कार्यालयाने शिक्कामोर्तब केलेला आहे. उद्या दुपारी ११:३० वाजता संजय राठोड हे नियोजित दौर्यानुसार पोहरादेवीला दर्शनासाठी जाणार असल्याची माहिती जिल्हाअधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे.
२३ फेब्रुवारीला मंगळवारी, सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास संजय राठोड हे इथं संपूर्ण कुटुंबासमवेत येणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे. इथं विधीवत पूजा संपन्न झाल्यानंतर आणि संतांचं दर्शन झाल्यानंतर धर्मपीठाला भेट दिल्यानंतर ते या ठिकाणहून निघतील असंही सांगण्यात आलं आहे. या ठिकाणी राठोड माध्यमांशी संवाद साधण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. असं झाल्यास ते नेमकं काय बोलणार याकडेच साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- आरोग्य खात्याच्या भरतीवरून मुनगंटीवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
- कोल्हापूरनंतर उस्मानाबादने मला जीवापाड प्रेम दिले-खा.छत्रपती संभाजीराजे
- शबनमला फाशी दिली तर अनर्थ ओढावेल; महंत परमहंसांचा इशारा
- मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- मास्क न घातल्यास रिक्षा होणार जप्त, पोलिसांचा मोठा निर्णय