पोटनिवडणुकीच्या विजयानंतर फटाके फोडायला चव्हाणांसोबत मुख्यमंत्रीही येणार- उदय सामंत

पोटनिवडणुकीच्या विजयानंतर फटाके फोडायला चव्हाणांसोबत मुख्यमंत्रीही येणार- उदय सामंत

मुंबई : देगलूर-बिलोलीची पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. यामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला आहे. काँग्रेसकडून माजी आमदार आबासाहेब आंतापूरकर यांचे चिरंजीव जितेस आंतापूरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेले सुभाष साबणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

होणे दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला छेद दे भाजपने ती आपल्यावर लादली आहे. आतापर्यंत जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात दुःखद प्रसंगामुळे पोटनिवडणुका झाल्या तेव्हा सगळ्या पक्षांनी एकत्रितपणे ती जागा संबंधित पक्षाला सोडली आहे. त्या कुटुंबातील व्यक्तीला बिनविरोध निवडून आणले आहे. स्व. आर.आर.पाटील, पंतगराव कदम यांच्या निधनानंतर त्या पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड करण्यात आली.

भाजपने पंढरपूर नंतर पुन्हा देगलूर-बिलोलीत उमेदवार देत ही निवडणुक आपल्यावर लादली. पण महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल झालेल्या संपर्कप्रमुखांच्या बैठकीत देगलूरच्या विजयानंतर अशोक चव्हाण यांच्या सोबत आपण देखील फटाके फोडायला जाणार असल्याचे सांगितले आहे, असे म्हणत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विजयाची खात्री दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या