लोकसभेच्या विजयानंतर सांगोल्यात भाजपची जोरदार मोर्चेबांधणी !

ganpatrao-deshmukh_

प्रविण काळे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांसाठी प्रतिष्ठेचा मानला गेलेला मतदारसंघ म्हणजे माढा मतदारसंघ. जोरदार प्रयत्न करून देखील राष्ट्रवादीला आपला गढ राखता आला नाही. भाजपचे रणजितसिंह निंबाळकर खासदार झाले आणि दिल्लीत गेले. परिणामी राष्ट्रवादीच्या गोटातले वातावरण मात्र चिंताजनक झाले आहे, हेही तेवढचं खर.

लोकसभेच्या निकालासोबत सगळीकडे विधानसभेची तयारी सुरु झाली. यावेळी सांगोला जिंकायचा या उत्साहाने भाजपा काम करायला निघाली आहे. सांगोल्याच्या राजकारणात कायम कळीचा मुद्दा ठरलेला पाणी प्रश्न आम्हीच सोडवणार अशी खात्री भाजप नेते आता मतदारांना द्यायला लागले आहेत. सांगोल्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर याच्या प्रचारात शहाजीबापू पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे विधानसभेसाठी त्यांची दावेदारी मजबूत मानली जात आहे. गणपतराव देशमुख यांच्याकडून तब्बल सहा निवडणुका हरल्यानंतर या निवडणुकीत तरी त्यांना सांगोल्याची जनता साथ देणार का ? हा मोठा प्रश्न आहे.

Loading...

विधानसभेला शिवसेना-भाजपा युती झाल्यास सांगोला नक्की कोणत्या पक्षाकडे जाणार, हाही प्रश्न आहे. आजपर्यंत जागावाटपात मतदारसंघ शिवसेनेकडे होता. कदाचित याही वेळी तो सेनेकडे राहील. अशी शक्यता आहे. त्यामुळे शहाजीबापूचा पक्ष कोणता हे मात्र अजून सांगता येत नाही, हे यासाठीच! कारण जागा कोणत्याही पक्षाकडे गेली तरी तिकीट आपल्याकडेच यावे, असा त्यांचा प्लॅन असावा. दुसरीकडे भाजपकडून तालुकाध्यक्ष श्रीकांत देशमुख देखील इच्छुक आहेत. तिकिटासाठी तेही प्रयत्नात आहेत. अचानक सांगोल्याच्या राजकारणात सक्रीय झालेल्या राजश्री नागणे या देखील चर्चेत आहेत. महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी आपलं जनसंपर्क देखील प्रस्थापित केला आहे. पण नवखा चेहरा असल्याने त्यांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. एकंदरीत भाजपने तयारी जोरात सुरु केली आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सततच्या दौऱ्याने कार्यकर्ते सक्रीय झाले आहेत.

पण देशात सर्वाधिक काळ आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम प्रस्थापित असलेले आमदार गणपतराव देशमुख याही वर्षी पुन्हा विधानसभेच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. सांगोल्यातून तब्बल अकरा वेळा शेतकरी कामगार पक्षातर्फे गणपतराव प्रतिनिधित्व करत आलेले आहेत. 1972 व 1995 असे दोन अपवाद वगळता 1962 पासून गणपतराव सतत सांगोला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आलेले आहेत. लोकांशी असलेला थेट संपर्क आणि स्वच्छ चारित्र्य हि गणपतराव देशमुख यांची आजपर्यंत बलस्थाने राहिलेली आहेत. गणपतराव देशमुख यांच्या वयोमानानुसार शेकाप कडून नवीन चेहरा देण्याची चर्चा मागच्या दोन निवडणूकापासून केली जाते आहे. याही वेळेसे पुन्हा तशी चर्चा सुरू आहे. पण जेष्ठ कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार याहीवेळेस गणपतरावच शेकापचे उमेदवार असतील अशी चिन्हे आहेत.

माजी आमदार व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिपक आबा सांळुखे पाटिल राष्ट्रवादीचे उमेदवार असू शकतात पण गणपतराव देशमुख व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वैयक्तिक संबंधामुळे राष्ट्रवादी याहीवेळेस गणपतरावांना समर्थन देईल.त्यामुळे दिपक आबा साळुंखे पाटील यांना पुन्हा नेपथ्याच्या भूमिकेत राहावे लागेल. विधानसभेच्या निवडणुकांना कमी कालावधी राहिला आहे. उमेदवारांनी मोर्चेबांधनी सुरू केली आहे. राज्यपातळीवरील युती-आघाडीच्या राजकारणाने स्थानिक पातळीवरील राजकारणाचे चित्रही बदलत राहिल. पण देशभर आपल्या विजयध्वज उंचावणाऱ्या भाजपला यावेळेस तरी सर्वाधिक काळ आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम असलेल्या गणपतरावांना भाजप रोखता येणार का ?

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बांगड्यांच्या वादात अमृता फडणवीसांची उडी, आदित्य ठाकरेंवर केला पलटवार
आता सुप्रिया ताईंना 'सेल्फी विथ खड्डे'चा विसर पडला आहे का?