तुकाराम मुंडेंची बदली होताच पुण्यात ‘त्या’ १५८ कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्दचा ठराव

पुणे: तत्कालीन पीएमपीएमएल अध्यक्ष तुकाराम मुंडे यांनी निलंबित केलेल्या १५८ पीएमपी कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द करण्याच्या प्रस्ताव संचालक मंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला. मुंडे यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी बदली होताच हा निर्णय घेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच निलंबित कर्मचाऱ्यांना पून्हा कामावर घेण्याचा निर्णय आज संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

पीएमपीएलचे १५८ कर्मचारी, वैद्यकीय रजेवर असलेले कर्मचारी, यांना पुन्हा सेवेत घेण्यात येणार आहे. तसेच जेष्ठ नागरिकांना देण्यात येणारी पास सवलत कायम ठेवण्यात आली आहे. कामावर गैरहजर असणे, उशिरा येणे तसेच वेगवेगळ्या कारणांमुळे या कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आल होत. मुंडे यांच्या जागेवर नव्याने नियुक्त झालेल्या नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठीकत या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. यावेळी पुणे आणि पिंपरी चिंचवडचे महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि पालिका आयुक्त उपस्थित होते. तुकाराम मुंडे यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक धडाकेबाज निर्णय घेतले. मात्र पीएमपीचे अनेक कर्मचारी त्यांच्यामुळे अडचणीत आले होते. याच मुद्द्यावरून सत्ताधारी नेत्यांनी मुंडे यांच्या बदलीची मागणी लावून धरली होती.