सिडनी टेस्टनंतर डेव्हीड वॉर्नरने मागितली मोहम्मद सिराजची माफी

devid

सिडनी : ऑस्ट्रेलियाचा अनुभवी बॅट्समन डेव्हीड वॉर्नरने भारतीय खेळाडू मोहम्मद सिराजची माफी मागितलीय. तिसऱ्या टेस्ट दरम्यान प्रेक्षकांकडून झालेल्या वर्णद्वेषीवर माफी मागितली. दर्शकांना असं करायला नको होतं असं तो म्हणाला. पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या सिराज व्यतिरिक्त जसप्रीत बुमराहला देखील वर्णद्वेषी विधानांचा सामना करावा लागला होता.

वॉर्नरने इंस्टाग्रामवर यासंदर्भात पोस्ट लिहीली.मी, मोहम्मद सिराज आणि भारतीय टीमची माफी मागतो. गैरव्यवहार कधीच स्वीकारार्ह नाही. प्रेक्षक यापुढे असं करणार नाहीत अशी आशा करतो असं त्याने पोस्टमध्ये म्हटलंय. दुखापतग्रस्त असल्याने वॉर्नर पहिल्या दोन मॅचला मुकला होता. परतल्यावर आनंद झाल्याचे तो म्हणाला. मॅचचा रिझल्ट हवा तसा नाही लागला पण हे टेस्ट क्रिकेट आहे. पाच दिवस आम्ही चांगले खेळलो. पण भारताने चांगला कमबॅक घेतला. हेच कारण आहे ज्यामुळे आम्ही क्रिकेटवर प्रेम करतो. हा सोपा खेळ नाहीय. आता ब्रिसबॅनमधील निर्णायक मॅचवर आमचे लक्ष आहे. तिथे खेळण्याची मज्जाच वेगळी असल्याचे तो म्हणाला.

ऑस्ट्रेलियातील सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियात तिसरा कसोटी सामना खेळवण्यात आला. साधारणपणे ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील सामन्यात खेळाडू एकमेकांना डिवचतात. यामध्ये काहीवेळा हे खेळाडू शिवीगाळही करतात. मात्र आता क्रिकेट सामना पाहायला आलेल्या चाहत्यांकडून शिवीगाळ तसेच वर्णद्वेषी टीका करण्यात आली होती. ऑस्ट्रेलियाच्या समर्थकांनी टीम इंडियाचे गोलंदाज मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह या दोघांना काल शनिवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशीशिव्या दिल्या असल्याचं प्रकरण समोर आलं होतं. या सर्व प्रकरणाबाबत टीम इंडियाकडून सामनाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. परंतु त्याचा काहीही परिणाम झाला नाही. कारण दुसऱ्या दिवशी देखील देखील काही ऑस्ट्रेलियन समर्थकांनी मोहम्मद सिराजवर वर्णद्वेषी टीका केली होती.

महत्वाच्या  बातम्या