हार्दिक पांड्या निलंबन झाल्यानंतर आज पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसला

टीम महारष्ट्र देशा : मैदानाच्या बाहेर असून देखील सतत चर्चेत असणाऱ्या हार्दिक पांड्याने निलंबन झाल्यानंतर आज पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दर्शन दिले. ‘कॉफी विथ करण- 6’ या कार्यक्रमात केलेल्या महिलांबद्दल आक्षेपार्ह विधानांमुळे अडचणीत आलेल्या हार्दिक पांड्याने स्वतःला खोली मध्ये कोंडून घेतले होते. त्यानंतर आज हार्दिक पांड्या मुंबई येथे विमानतळावर दिसला.

Loading...

दरम्यान, भारताचा कर्णधार विराट कोहली याने हार्दिक पांड्याची पाठराखण केली आहे. कोहली म्हणाला की, पंड्या आणि राहुल हे दोघेही भारतीय संघाचे सदस्य आहेत. तसेच ते एक जबाबदार क्रिकेटपटू आहेत. पण त्यांनी जे मत व्यक्त केले आहे, त्याच्या संघाशी किंवा त्यांच्या खेळाशी काहीही संबंध नाही. कारण ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. या त्यांच्या मताशी आमचे काहीही देणेघेणे नाही. त्यामुळे या त्यांच्या वक्तव्याचा संघावर किंवा आमच्या कामगिरीवर काहीही परीणाम होणार नाही. आता आम्ही फक्त याबाबत पुढे नेमके काय होते, यावर लक्ष ठेवून आहोत.

हार्दिक पांड्या आणि के एल राहुल हे ‘कॉफी विथ करण- 6’ या कार्यक्रमात आले होते. त्यावेळी त्यांनी महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केली होती त्यामुळे दोघांनाही बीसीसीआय ने निलंबित केले आहे. तसेच सोशल मिडीयावर देखील हार्दिक पांड्यावर लोकांनी टीकेची झोड उठवली होती. त्यामुळे पांड्या मैदानात नसला तरी सतत चर्चेत आहे.

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...