अखेर विद्यार्थांच्या उपोषणाला यश! विद्यापीठ प्रशासन झुकले

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आरोग्य केंद्रातील भोंगळ कारभारा विरोधात आवाज उठवला म्हणून विद्यापीठाने  विद्यार्थांवर गंभीर गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे गुन्हे मागे घ्यावे व आरोग्य केंद्रातील परिस्थिती सुधारावी म्हणून गेल्या दोन दिवसांपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या उपोषणाला आज यश मिळाले.

दोन दिवस चाललेल्या या उपोषणाची समाप्ती स्वतः कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना सरबत पाजून केली. यामध्ये आरोग्य केंद्राच्या सर्व मागण्यांचा समावेश आहे. दि २५ जानेवारीला आरोग्य विभागात अभाविप च्या कार्यकर्त्यांनी आरोग्य केंद्रात आंदोलन केले होते. येत्या महिन्यापर्यंत गुन्हे मागे घेण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही विद्यापीठाने दिली आहे . या आंदोलनात श्रीराम कंधारे,विनायक राजगुरू, रंगा हणमंत,प्रियांका रणदिवे यांच्यासह एकूण 8 जणांचा समावेश होता .

You might also like
Comments
Loading...