बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यानंतर आता आनंद दिघेंचाही पुतळा उभारा; मनसेची मोठी मागणी

ठाणे:- मुंबईतील गेट वे जवळच्या श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे मागील आठवड्यात अनावरण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे अनावरण झाले आहे. या समारंभाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यानंतर शिवसेनाप्रमुखांचे पुत्र आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावूक प्रतिक्रिया दिली. हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय, कायम लक्षात राहणारा क्षण आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आल्यानंतर आता राज ठाकरे यांच्या मनसेने एक मोठी मागणी केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे ठाण्यात शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचा पुर्णाकृती पुतळा उभारला जावा, असे मनसेने म्हटले आहे.

या मागणीसाठी बुधवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांची भेट घेत त्यांच्याकडे निवेदन सादर केले. ठाणे शहराचा केंद्रबिंदू असलेल्या चिंतामणी चौकात आनंद दिघे यांचा हा पुतळा उभारण्यात यावा, असे या निवेदनात म्हटले आहे. ठाणे-पालघर मनसे जिल्हा अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांकडून ही मागणी करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या