उदगीर मध्ये सातव्या दिवशी श्री च्या विसर्जनास सुरवात

लातूर (प्रतिनिधी) : सात दिवसाच्या उत्साहपूर्ण वातावरण नंतर लाडक्या गणरायाचे विसर्जन आज (गुरुवारी) होत आहे. विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात ठीक ठिकाणी जिल्हा पोलिस दलाच्या वतीने तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला असून शरतील एकूण 46 परवाना धारक गणेश मंडळांनी यंदा श्रीची प्रतिष्ठपणा केली होती.

सात दिवसात शरतील विविध मंडळाकडून अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले होते. आज दुपार पासूनच पारंपरिक वाद्यच्या माध्यमातून मिरवणुका काढण्यात आल्या. यंदा जिल्हा प्रशासनाच्या वतीने डॉल्बीमुक्त वातावरणात मिरवणूक व्हाव्यात यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले.

शहरतील 64 सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदधिकर्यांनी विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी केली. उदगीर शहरतील मनाचा आजोबा गणपती आहे. या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परंपरे प्रमाणे सर्वप्रथम विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. तर जिल्हा कांग्रेस आणि उदगीर शहर युवक कांग्रेस कडून आणि उदगीर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विसर्जन मिरवणुकीतील मंडळाच्या कार्यकर्त्याच्या स्वागतासाठी मोठी तयारी करण्यात अली.

विसर्जन मिरवणुकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने शहरतील सहा अतिसंवेदशील ठिकाणी पोलीस दलाच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला. संपूर्ण शहरात जिल्हा अधिक्षक तसेच अप्पर पोलीस निरीक्षक, 6 उपधीक्षक, 471 पोलीस कर्मचारी, 41 महिला पोलीस कर्मचारी , 220 होमगार्ड, 6 एस आर पी फ च्या तुकड्या, 3 आर सी पी च्या तुकड्या तर क्यूआरटी चे पथक आदी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे .