मुंबई : विधानपरिषदेच्या निकालानंतर राज्यातील राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात दूषित झालं आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली आहे. दिवसेंदिवस महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. शिंदे गटाला जवळपास सेनेच्या ४० आमदारांचा समर्थन आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
यानंतर आज आज संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोशल मीडियावर येऊन पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर करणार होते. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाकरेंना थांबवलं. तसेच असा टोकाचा निर्णय घेण्यापासून रोखल्याचं सांगितलं जात आहे. शरद पवारांनी याआधी उद्धव ठाकरेंना एकदा नाही तर दोनदा राजीनामा देण्यापासून रोखलं आहे. एका वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे.
दरम्यान, या राजकीय गदारोळावर गेल्या आठवड्यातच उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली होती. शिवसेनेच्या आमदारांनी मला येऊन सांगावं की, तुम्ही मुख्यमंत्री नकोय आम्हाला. फक्त समोर येऊन सांगावं किंवा माध्यमांच्या सहाय्याने संवाद साधला तरी चालेल पण मी मुख्यमंत्री नकोय असे जेव्हा ते त्यांच्या तोंडून सांगतील त्या क्षणी मी राजीनामा देईन, मी दोन्ही पद सोडायला तयार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.
महत्त्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<